पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पती घानात, कोरोनाग्रस्त पत्नी ICUत, मुलाला बाधा, दिव्यांग मुलगी नोकरासोबत

कोरोना

कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे मुळचा चेंबूरमधला आणि सध्या घानामध्ये अडकलेल्या  ४७ वर्षीय व्यावसायिकाची काळीज पिळवटून काढणारी गोष्ट समोर आली आहे.  या व्यवसायिकाच्या पत्नीला कोरोना विषाणूची बाधा झाली, ती मुंबईतच्या फोर्टिस रुग्णालयात ICUत आहे तर या महिलेच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या १४ वर्षांच्या मुलालाही कोरोनाची बाधा झाली आहे. महिला आणि तिचा मुलगा फोर्टिसमध्ये कोरोनाचे उपचार घेत आहेत. 

संबधीत महिलेनं कोरोनाची लक्षणे आढळल्यानं दोनदा कस्तुरबा रुग्णालयात संपर्क साधला होता, मात्र ती परदेशी प्रवास करुन आली नव्हती त्यामुळे ट्रॅव्हल हिट्री नसल्यानं तिच्या चाचण्या नाकारण्यात आल्या होत्या. एका खासगी चाचणी केंद्रातून तिनं स्त्राव चाचणी करुन घेतल्यानंतर तिला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं. 

गेल्या १२ तासांत देशात कोरोनाचे ३०२ रुग्ण

१९ मार्चपासून या महिलेमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली होती. सध्या या महिलेला आयसीयुत ठेवण्यात आलं आहे. तर त्यांची ९ वर्षांची दिव्यांग मुलगी घरी नोकरांसोबत एकटी आहे त्यामुळे त्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. 'मी हजारो किलोमीटर दूर आहे, मी हतबल आहे मला सर्वाधिक चिंता ही आमच्या ९ वर्षांच्या लहान मुलीची आहे. आमची लहान मुलगी चालू, बोलू शकत नाही तसेच ती स्वत:च्या हातानं खाऊही शकत नाही म्हणून आम्हाला तिची जास्त काळजी सतावत आहे', असं महिलेच्या पतीनं हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीत सांगितले.

कोविड-१९ : तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, ICMR कडून आवाहन

या व्यवसायिकानं परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना केली आहे. 'आंतरराष्ट्रीय वाहतूक बंद आहे. राज्याच्या सर्व सीमा बंद आहेत हे मला मान्य आहे मात्र माझ्या कुटुंबीयांना माझी आवश्यकता आहे, माझा २२ वर्षांचा भाचा माझ्या मुलीसोबत आहे मात्र त्यालाही परिस्थिती कशी हाताळायची हे समजत नाही', त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर मदत करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.