पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आधी फोन चोरला मग स्वत:चा फोटो काढला आणि नंतर.......

प्रातिनिधिक छायाचित्र

सेल्फीमुळे अनेकांचे जीव गेल्याचे किंवा अनेकजण अडचणीत सापडल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असलीत, मात्र सेल्फीमुळे भुरटा चोर पकडला गेल्याच्या घटना क्वचितच ऐकल्या असतील. रेल्वे स्थानकावर मोबाइल फोन, पाकीट, प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या भुरट्या चोराला रेल्वे पोलिसांनी एका सेल्फीमुळे अटक केली आहे. अबुझर अबुबक्र असं  या ३२ वर्षीय भुरट्या चोराचं नावं आहे. सेल्फी काढण्याच्या नादात त्यानं चुकून ज्याचा फोन चोरला त्या व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वत:चा फोटो अपलोड केला होता. त्यामुळे ही चोरी पडकली गेली.

'नाईट लाईफ'मुळे महिलांची सुरक्षा धोक्यात, पोलिसांवर ताण- आशिष शेलार

असा सापडला चोर तावडीत
वडाळ्याचा रहिवाशी असलेला वैभव गुरव मंगळवारी दादर स्थानकात लांब पल्ल्याच्या ट्रेनची तिकीट काढण्यासाठी आला होता. मात्र तिकीट काऊंटर बंद होतं. त्यामुळे तो काऊंटरशेजारीच झोपला. पहाटे जाग आल्यावर बॅग आणि मोबाईल चोरीला गेल्याचं गौरवच्या लक्षात आलं. त्यानं नजीकच्या पोलिस स्थानकात याची तक्रार केली. बुधवारी गौरवच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका अज्ञात व्यक्तीचा सेल्फी दिसला. गौरवच्या मित्रानं गौरवच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. गौरवनं हा फोटो पोलिसांना दाखवला. 

केरळने राहुल गांधींना निवडून विनाशकारी काम केलंयः रामचंद्र गुहा

गुरुवारी उशीरा रात्री पोलिसांना त्याच तिकीट काऊंटर परिसरात चोरीच्या बेतात असलेला अबुझर अबुबक्र दिसला. पोलिसांनी त्याला अटक केली. गौरवच्या मोबाइलमधील कॅमेराची क्वालिटी तपासण्यासाठी आपण काही सेल्फी काढले. तसेच सोशल मीडियावरचे सेल्फीसाठी उपलब्ध असणारे फिल्टर वापरुनही काही सेल्फी काढले त्यातला एक सेल्फी अनावधानानं गौरवच्या पर्सनल अकाऊंटवरून अपलोड झाला होता. या फोटोच्या आधारेच पोलिसांनी या भुरट्या चोराला अटक केली.