पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भागीदाराचा गळा कापून खून, पुण्यातून एक जण ताब्यात

प्रातिनिधिक छायाचित्र

व्यावसायिक भागीदाराचा गळा कापून खून केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. सारंग पाथरकर असे त्याचे नाव आहे. आनंद नारायणन (वय ३८) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते लेखापाल होते. सीसीटीव्ही फुटेज, एकाने दिलेली साक्ष आणि इतर पुराव्यांच्या आधारे मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२.०१ वाजता पाथरकर, नारायणन आणि थंबी नावाची व्यक्ती एका सात मजली इमारतीमध्ये प्रवेश करीत असल्याचे दिसते. हे तिघेही नारायणन यांच्या घरात प्रवेश करीत असल्याचेही दिसते आहे. थंबी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते स्वतः त्या दिवशी रात्री हॉलमध्ये झोपले होते. नारायणन हे त्यांच्या बेडरुममध्ये झोपले होते. पाथरकर रात्री नारायणन यांच्या बेडरुममध्ये घुसला आणि त्याने गळा कापून नारायणन यांचा खून केला, असे थंबी याने पोलिसांना सांगितले.

इग्लंडमध्ये लिफ्टच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार करणाऱ्या भारतीयास ७ वर्षांची शिक्षा

पाथरकर आपल्या दुचाकीमधून एक चाकू काढत असल्याचे आणि इमारतीमध्ये प्रवेश करीत असल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आहे. रात्री १.५५ वाजता थंबी इमारतीतून बाहेर पडत असल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आहे. त्यानंतर पाथरकरही पळत पळत बाहेर आला आणि त्या दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. हा सर्व प्रकार घडल्यानंतर थंबी याने सुरुवातीला गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याची माहिती दिली. त्यांनी पोलिस ठाण्यात माहिती देण्याची सूचना केली. पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सुरुवातीला थंबीला ताब्यात घेतले. पाथरकर पुण्याला पळाला असल्याची माहिती थंबीने पोलिसांना दिल्यावर एक पथक पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. पोलिसांच्या पथकाने त्याला पुण्यातून ताब्यात घेतले. लवकरच त्याला अटक दाखविण्यात येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.