पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आधी पोलिसांनी बुडताना वाचविले नंतर दारू पिऊन गाडी चालविली म्हणून अटक केले!

प्रातिनिधिक छायाचित्र

एका माणसाला बुडताना वाचविल्याचा आणि त्यालाच पुन्हा मद्यप्राशन करून गाडी चालविल्याबद्दल अटक केल्याचा हटके प्रसंग मुंबई पोलिसांसोबत घडला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुडगावमधील एका शेअर ब्रोकरला अटक केली आहे. रिशू चोपडा (वय ३८) असे त्याचे नाव आहे. त्याचा मित्र सौरव आनंद (३७) याला पोलिसांनी अटक केली आहे.

रविवारी सकाळी रिशू चोपडा वर्सोवा किनाऱ्यावर पोहायला गेला होता. त्यावेळी पोहोताना तो बुडू लागल्यावर किनाऱ्यावरील स्थानिकांनी आणि एका पोलिसांनी त्याला वाचविले. त्यानंतर वर्सोवा पोलिसांनी त्याला मद्यप्राशन करून गाडी चालविल्याबद्दल अटक केली. 

रोहितचा हटके अंदाजातील फोटो होतोय व्हायरल!

वर्सोवाच्या किनाऱ्यावर गस्त घालत असलेले पोलिस कॉन्स्टेबल नीलेश जाधव यांना शनिवारी रात्री १ वाजता माहिती मिळाली की किनाऱ्यावर कोणीतरी बुडाले आहे. जाधव लगेचच घटनास्थळी गेले आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीने रिशू चोपडा याला वाचविले. मुंबईत पहिल्यांदाच आलो आहे. त्यामुळे समुद्रात पोहोण्यासाठी गेलो होतो, असे त्याने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी रिशू चोपडा आणि त्याचा मित्र सौरव आनंद या दोघांना तिथून निघून जाण्यास सांगितले.

यानंतर हे दोघेही मद्यप्राशन करण्यास गेले. ते झाल्यावर ते वेगाने आपली गाडी जेपी रस्त्यावरून चालवू लागले. जाधव यांना पुन्हा एकदा या रस्त्यावरून एक गाडी वेगाने जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर जाधव त्या गाडीच्या दिशेने गेले. त्यांच्यासोबत एक पोलिस उपनिरीक्षकही होते. पुढे चोपडा याची गाडी वाहतूक कोंडीत अडकल्यावर पोलिसांनी त्यांना रोखले आणि गाडीतून बाहेर काढले. 

Jio GigaFiber ग्राहकांना 'फर्स्ट डे, फर्स्ट शो' पाहता येणार

रिशू चोपडा आणि सौरव आनंद दोघेही मद्याच्या अमलाखाली असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांच्या गाडीमध्येही मद्याच्या बाटल्या सापडल्या. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.