पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घरपोच मद्य देतो सांगून ३० हजारांचा गंडा

मद्य विक्रीस हायकोर्टाची परवानगी

घरपोच मद्य देतो असं सांगून मुंबईतील ३७ वर्षीय व्यक्तीला ३० हजारांचा गंडा घालण्यात आला. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद आहेत. मात्र घरपोच दारु देतो असं सांगून रुग्णालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला ऑनलाइन ३० हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. या व्यक्तीनं आग्रीपाडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

राज्यात मुंबईनंतर पुणे दुसऱ्या क्रमांकाचं कोरोनाचं हॉटस्पॉट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीला २९ मार्चला फोनवर मिस्ड् कॉल आला होता. संबधीत व्यक्ती हा भायखाळा येथील एका मद्यविक्री दुकानातून नेहमी दारू विकत घ्यायचा.  फोनवरुन याच दुकानातून विक्रेता बोलत असल्याचं त्याला भासवण्यात आलं. मद्याच्या आमिषानं संबधीत व्यक्तीनं ऑनलाइन पैसे भरून मद्य मागवलं.

फक्त दिवे बंद करा, इतर उपकरणं सुरु ठेवण्याचं महापारेषणचं आवाहन

त्यानं मद्यासाठी २० हजार रुपये दिले, त्यानंतर फोनवरुन त्याच्याकडून अतिरिक्त दहा हजारांची मागणी केली. या व्यक्तीनं एकूण ३० हजार रुपये दिले. या व्यक्तीकडून पैसे उकळल्यानंतर गुन्हेगारानं त्याचा नंबर ब्लॉक केला. आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच संबधीत व्यक्तीनं आग्रीपाडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिस गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.