पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतील चाळीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

लहान मुलीवर बलात्कार

अंधेरीमध्ये एका चाळीत राहणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ४५ वर्षांच्या आरोपीला अटक केली. शुक्रवारी संध्याकाळी अंधेरी पश्चिममध्ये एका चाळीत ही घटना घडली. संबंधित मुलीच्या आईने तिच्या सहा वर्षांच्या मुलीला आपल्या आईच्या घरी ठेवले होते. त्यावेळी ही घटना घडली.

'डॉक्टरांचे प्रेस्क्रिप्शन असलेल्यांना मद्य द्या'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी संबंधित मुलगी तिच्या आजीच्या घरासमोरील मोकळ्या जागेत खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला बघितले. त्याने तिला बोलावून घेतले आणि आपल्या घरात नेले. घरात नेल्यावर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जर याबद्दल कोणाला सांगितले तर मारून टाकेन, अशी धमकीही आरोपीने पीडित मुलीला दिली.

पीडित मुलीच्या आईला दुसऱ्या दिवशी सकाळी याबद्दल माहिती मिळाली. तिने लगेचच डीएन नगर पोलिसांकडे याबद्दल तक्रार दाखल केली. पोलिसांनी शनिवारीच आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयाने २ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

लॉकडाऊननंतर नरेंद्र मोदी यांचे दैनंदिन काम नेहमीप्रमाणेच, फक्त...

डीएन नगर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ५०६ (गुन्हेगारी कट) आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्याच्या (पॉस्को) कायद्यातील कलम ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.