पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कल्याणमध्ये प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

कल्याण रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका लॉजमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या करून नंतर स्वतःही आत्महत्या केली. प्रेम संबंधातील वादामुळे ही घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अरूण गुप्ता असे प्रियकराचे तर प्रतिभा प्रसाद असे प्रेयसीचे नाव आहे.

विंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, पॅराशूट रेजिमेंटला देणार २ महिने

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण गुप्ता आणि प्रतिभा हे दोघेही शुक्रवारी दुपारी दीड वाजता या लॉजमध्ये आले होते. संध्याकाळपर्यंत ते लॉजमध्ये होते. त्यांच्या खोलीतून कोणताही प्रतिसाद येत नसल्यामुळे लॉजच्या व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावले. रात्री साडेनऊ वाजता या ठिकाणी दोन मृतदेह आढळले. अरूण गुप्ता याने आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिभाचा खून केला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

हाफिज सईदला यापूर्वी केलेली अटक म्हणजे निव्वळ दिखावाः अमेरिका

अरूण हा मुळचा उत्तर प्रदेशमधील आझमगढचा होता. तर प्रतिभा ही सुद्धा मूळची उत्तर प्रदेशमधील होती. पण ती घाटकोपरमध्ये स्थायिक झाली होती. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.