पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंधेरी एमआयडीसीतील इमारतीला भीषण आग

अंधेरीत इमारतीला भीषण आग

मुंबईतील अंधेरी पूर्वमधील औद्यागिक वसाहतीमध्ये असलेल्या रोल्टा कंपनीच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. सकाळी साडे अकराच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. ही भीषण आग तिसऱ्या मजल्यासह टेरेसपर्यंत भडकल्यानंतर अथक प्रयत्नानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र ही आग पुन्हा भडकल्याचे पाहायला मिळाले. 

मॅच फिक्सिंगचा आरोपी संजीव चावलाचे इंग्लंडहून भारतात

सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.  या आगीची तीव्रता लेव्हल चार इतकी होती. २० पेक्षा अधिक अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीशमन दलाच्या जवानांना ही आग विझवणे अशक्य असल्यामुळे थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखील आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले.  

लखनऊच्या कोर्टात बॉम्ब हल्ला, दोन वकील जखमी

आग लागल्याचे लक्ष्यात आल्यानंतर कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तसेच आजूबाजूच्या सर्व इमारती रिकाम्या करण्यात आल्या होत्या. इमारतीमध्ये कोणीही अडकलेले नाही तसेच या घटनेत कोणतीही जिवीतहानी घडलेली नाही, अशी माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.