पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उरण येथील ONGC प्लॅंटमध्ये भीषण आग, चौघांचा मृत्यू

उरणमध्ये ओएनजीसी प्लॅंटमध्ये भीषण आग

उरणमधील ओएनजीसी प्लॅंटच्या एका युनिटमध्ये मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. आगीमध्ये चौघांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. द्रव पदार्थाच्या गळतीमुळे आग लागल्याची माहिती मिळते आहे. प्राथमिक माहितीनुसार या आगीमध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ओएनजीसी, जेएनपीटी, द्रोणागिरी यांचे अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई आणि अन्य ठिकाणांहूनही अग्निशामक दल आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहे.

मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये पावसाचा जोर, रस्ते-लोकल वाहतूक उशिराने

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण उरणमधील ओएनजीसीच्या प्लॅंटच्या एका भागातून ज्वाळांचे मोठे लोट बाहेर येताना दिसत आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात धूरही बाहेर येताना दिसतो आहे. काही वृत्तवाहिन्यांनी या संदर्भातील दृश्ये प्रसारित केली आहेत.

आगीमुळे या गॅस प्रक्रियेवर परिणाम झाला नसून, या ठिकाणचा गॅस हाजिरा प्लॅंटमध्ये वळविण्यात आला आहे. ओएनजीसीचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असे ओएनजीसीने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अग्निशमन करणारे दोन जवान ९० टक्के भाजले गेल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी 'एबीपी माझा' वाहिनीशी बोलताना दिली.