पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कार्यकर्ते आग्रही पण निर्णय राजसाहेबांच्या हातीः नांदगावकर

राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. पण यावर अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख राज ठाकरे हे घेणार असल्याची माहिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

विभाग अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा अहवाल तयार केला असून तो आम्ही आता राज ठाकरेंना देणार आहोत. कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमिका मांडलेली आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय हा राज ठाकरेंचा आहे. तेही याचा सकारात्मक विचार करतील, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

युतीचा फॉर्म्युला ठरलाय, दोन दिवसांत कळवूः उद्धव ठाकरे

निवडणूक लढवायचे झाल्यास ती एकट्याने की आघाडी करुन त्याचाही अद्याप विचार केलेला नाही. आतापर्यंत आमची भूमिका ही 'एकला चलो रे' अशीच होती. फक्त गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही एका पक्षाला पाठिंबा दिला होता. 

अमित ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अमित हे पक्षाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित असतात. ते पक्षाच्या खालच्या फळीत काम करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

मेट्रोला पाठिंबा देणाऱ्या बच्चन यांच्याविरोधात नाराजीचे सूर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mahashtra assembly election 2019 mns party worker Insistent to contest election but decision on raj thackerays hand says bala nandgaonkar