पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाचः सरोज पांडे

सरोज पांडे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्रच्या प्रभारी सरोज पांडे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, असे म्हटले आहे. शिवसेनेच्या स्थापना दिनी पक्षाच्या मुखपत्रात पुढचा मुख्यमंत्री सेनेचाच असेल असा दावा करण्यात आला होता. त्याचवेळी आता पांडे यांनी हे वक्तव्य केले आहे. पांडे यांच्या या वक्तव्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.

'फिर एक बार शिवशाही सरकार', 'अबकी बार २२० के पार'; भाजपची नवी 

पांडे यांच्या वक्तव्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. 

शनिवारी दादर येथील प्रदेश कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाचे खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाने कोण मोठा भाऊ हे सांगितले आहे. भाजपचे २३ आणि शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक जागांवर शिवसेनेच्या विजयासाठी भाजपने मेहनत घेतली होती, असा दावाही महाजन यांनी केला. 

शेतकऱ्याला नडाल तर गाठ शिवसेनेशी, उद्धव ठाकरेंचा इशारा

यावेळी बैठकीत 'अबकी बार 220 पार'ची घोषणा करण्यात आली. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भाजप राज्यभरात विकास रथयात्रा काढणार आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ही रथयात्रा जाईल. बैठकीत पक्षाने चार नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. बैठकीत पक्षाच्या प्रभारी पांडे यांनी राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातील बुथस्तरावर संघटना मजबूत करण्याचे निर्देश दिले.