पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याच्या खर्चाचा आकडा आला समोर

(छाया सौजन्य : PTI)

महाविकास आघाडी सरकारचा भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याच्या खर्चाचा आकडा  माहितीच्या अधिकाराखाली उघड करण्यात आला आहे. या सोहळ्यावर २.७९ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आल्याची माहिती, 'माहिती अधिकार' कार्यकर्ते निखिल चनशेट्टी यांना देण्यात आली आहे. चनशेट्टी यांनी याबाबत माहिती मागितली होती. दादर येथील शिवाजी पार्क अर्थात शिवतिर्थावर महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा २८ नोव्हेंबर २०१९ ला पार पडला होता. या सोहळ्यासाठी एकूण २.७९ कोटी रुपये  खर्च करण्यात आला हा खर्च फडणवीस सरकारच्या २०१४ मधील शपथविधी सोहळ्यापेक्षा अधिक असल्याचंही समोर आलं आहे.

 

नव्या मंत्र्यांचे बंगले, कार्यालयाच्या नूतनीकरणाचा खर्च चक्रावून टाकणारा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा सहा कॅबिनेट मंत्र्यांना यावेळी राज्यपालांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली होती. या शपथविधी सोहळ्याचा भव्य सेट कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारला होता.  या सोहळ्यातील २ कोटी ७९ लाख ७ हजार ३७४ रुपयांपैकी ३ लाख ३ हजार २५७  रुपये हे फुलांच्या सजावटीसाठी वापरण्यात आले तर २ कोटींहून अधिक रक्कम ही लायटिंग आणि अन्यबाबींसाठी वापरण्यात आल्याची माहिती यातून समोर आली आहे. 

राज्यातही होणार 'तान्हाजी' करमुक्त, लवकरच घोषणा

चनशेट्टी यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मधल्या शपथविधी सोहळ्यातील खर्चाचे आकडे माहितीच्या अधिकाराखाली मागवले होते. त्यांना २००९ सालातल्या शपथविधी सोहळ्यातील  खर्चाची माहिती मिळाली नाही, २०१२ साली मंत्रालयाला लागलेल्या आगीत ही कागपत्रे जळाली असं सांगण्यात आलं आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर झाला होता. त्या सोहळ्यावर ९८.३७ लाख रुपये इतका खर्च झाला होता, अशीही माहितीही त्यांनी दिली. २०१४ आणि २०१९ मधील शपथविधी सोहळ्यातील खर्चात एकूण १.८१ कोटींची तफावत असल्याचंही यातून दिसून आलं.