पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोटामध्ये अडकलेल्या २००० विद्यार्थ्यांना ठाकरे सरकार आणणार महाराष्ट्रात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (छायाचित्रः टि्वटर)

राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्राचे दोन हजाराहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ठाकरे सरकारने प्रयत्न सुरु केले असून लवकरच हे विद्यार्थी आपल्या घरी परततील. यासाठी राज्य सरकारने १०० बसेसची सोय केली असून ती लवकरच कोटा येथे जाणार आहेत. हे सर्व विद्यार्थी लॉकडाऊनमुळे कोटा येथे अडकून पडली आहेत. 

मुंबईतील ५५ पेक्षा जास्त वयाचे पोलिस घरी थांबले तरी चालेल - आयुक्त

परिवहन मंत्री अनिल परब यांनी येत्या दोन दिवसांत एमएसआरटीसीच्या बसेस कोटा येथे रवाना करण्यात येणार असल्याचे सांगितले. इयत्ता बारावीनंतर विविध प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग क्लाससाठी देशभरातील अनेक विद्यार्थी कोटा येथे जातात. महाराष्ट्रातील विद्यार्थीही तिथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जातात. 

देशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू

अनिल परब पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने कोटा येथे गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही यासाठी धुळे येथून कोटाला जाण्यासाठी सुमारे १०० बसेस पाठवणार आहोत. या विद्यार्थ्यांना आधी धुळे जिल्ह्यात आणले जाईल. त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल. 

लॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक

राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सरकारबरोबर यावरुन चर्चा झाली असल्याचे एमएसआरटीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या आई-वडिलांना १४ दिवस होम क्वारंटाइन करावे लागेल, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.