पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसे निवडणूक लढण्याची शक्यता, राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधासभा निवडणूक  लढणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र मनसे विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसे १०० जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उमेदवारांची यादी मागवली असल्याचे सांगितले जात आहे.

VIDEO: भाजप नेत्याने पक्ष कार्यालयाबाहेर पत्नीला केली मारहाण

मनसेच्या मुंबई विभाग अध्यक्षांची महत्वाची बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून मनसेच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. निवडणूक लढवायची झाल्यास आपली किती तयारी आहे, याचा आढावा बैठकीतून घेण्यात आला. या बैठकीमध्ये मनसे १०० जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करणार असल्याचे सांगितले जात आहे.

युतीचा फॉर्म्युला ठरलाय, दोन दिवसांत कळवूः उद्धव ठाकरे

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या ठराविक शहरांमध्येच मनसेने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र राज ठाकरे घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. हे सर्व विभागप्रमुख असून त्यांच्याकडून विभागाचा आढावा घेतला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आता आदेश काय द्यायचा आम्ही ठरवू, शरद पवारांची