पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या १६ जणांना कोरोना

जितेंद्र आव्हाड

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पाच पोलीस कर्मचारी, बंगल्यातील सहाय्यक, नोकर, स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.

३५२ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २,३३४ वर

सोमवारी एका पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या पोलिसाच्या संपर्कात आल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइम करुन घेतले. आव्हांडाच्या बंगल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. रात्री उशिरा त्यांचा तपासणी अहवाल आला. यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

कोविड १९: पुणे शहरातील आणखी २२ ठिकाणे सील करण्याचा प्रस्ताव

राज्यात सोमवारी कोरोनाच्या ३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २३३४ वर पोहचला आहे. तर कोरोनामुळे राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १६० झाली आहे. कोरोनाबाधित २२९  रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Good News: १५ राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra minister jitendra awhad security personal and staff tested corona virus positive