पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प पुढे ढकलता येईल का? याचा विचार सुरु'

जयंत पाटील

बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प पुढे ढकलता येईल का?, याचा विचार सुरु असल्याचे महाराष्ट्र सरकारचे मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी सांगितले. राज्य सरकार हे माहित करुन घेण्याचा प्रयत्न करत आहे की, राज्यामध्ये ४ लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. ते पाहता बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प पुढे ढकलता येऊ शकतात का? याचा विचार सुरु आहे असे, जयंत पाटील यांनी सांगितले.

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार; २ नागरिकांचा मृत्यू

राज्यावर ४ लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याचसोबत वेगवेळे प्रकल्प सुरु केले आहे त्याचे २ लाख कोटींचे कर्ज आहे. किती प्रकल्पाचे पैसे राज्य सरकारला परत फेडीसाठी जबाबदारी येणार आहे. याचा अंदाज घेण्यसाठी बैठक बोलावली. शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी काही प्रकल्प आवश्यक आहे. काही प्रकल्प उशिरा घेता येतात का याचा विचार आम्ही करत आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.  

'माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास, बंडखोरी माझ्या रक्तात नाही'

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसह राज्यामध्ये सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. जयंत पाटील यांनी या आदेशानंतर हे वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनेशी बोलताना जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली डोंबिवलीच्या रेल्वे प्रवाशांची व्यथा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra minister jayant patil says government trying to ascertain if projects like bullet train can be deferred