पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंळचा आज विस्तार

उद्धव ठाकरे

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा अखेर सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. राज्यामध्ये तब्बल चौतिसाव्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तिन्ही पक्षांचे एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, असे सांगितले जात आहे. 

 

विना हेल्मेट प्रियांका गांधी स्कुटीवर स्वार, ६१०० रुपयांचा दंड

दरम्यान, मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात दुपारी एक वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला शपथविधी सोहळा असल्यामुळे जय्यत तयारी करण्यात आली आहे. विधानभवनाच्या परिसरातील पार्किंगच्या जागेवर भव्य स्टेज आणि मंडप उभारण्यात आले आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन असे एकूण ६ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर झाला होता. 

'भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी इकॉनॉमी, फ्रान्स-ब्रिटनला टाकले मागे'

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठवली आहे. यामध्ये शिवसेनेकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याचे सांगितले जात आहे. या शपथविधी सोहळ्या दरम्यान तिन्ही पक्षांकडून कोण-कोण नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

फाळके अवॉर्ड स्वीकारताना बिग बींनी केले 'रिटायरमेंट'वर भाष्य