पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Maharashtra Exit Poll : राज्यात पुन्हा एकदा युतीच वरचढ ठरण्याचा अंदाज

भाजप शिवसेना युतीला पुन्हा एकदा जास्त जागा मिळण्याचा अंदाज

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या जागा गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा वाढण्याचा अंदाज एक्झिट पोलनी दिलेला असला, तरी पुन्हा एकदा राज्यात भाजप, शिवसेना युतीच सर्वाधिक जागा जिंकेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. एबीपी नेल्सनने केलेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना अनुक्रमे १७ आणि १७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना अनुक्रमे ४ आणि ९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

गुजरातमध्ये भाजपला २५-२६ जागांचा अंदाज: इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस एक्झिट पोल

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २३ जागांवर यश मिळाले होते. पण यावेळी त्यांच्या जागा कमी होतील, असा अंदाज एक्झिट पोलच्या आकड्यांवरून दिसतो आहे. तर दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला गेल्यावेळी १८ जागांवर यश मिळाले होते. त्यांच्याही जागा कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे युतीच्या एकूण जागा राज्यात कमी होतील, असे एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून म्हणता येईल.

दुसरीकडे यंदा आपल्या जागा वाढविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने खूप मेहनत घेतली होती. दोघांच्या जागा वाढण्याची शक्यता असली, तरी युतीपेक्षा त्यांच्या जागा कमी राहण्याचा अंदाज आहे. एबीपी नेल्सनच्या आकडेवारीप्रमाणे काँग्रेसला ४ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ २ जागाच मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागांवर यश मिळाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये चांगली वाढ होईल, असे एक्झिट पोलच्या अंदाजांवरून दिसते.

Loksabha Election 2019 : सातव्या टप्प्यातील मतदान समाप्त, ६० टक्के मतदान

राज्यात एक जागा अपक्ष किवा अन्य कोणत्या तरी आघाडीला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यामध्ये एकतर स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा वंचित बहुजन आघाडीला ही जागा जाऊ शकते.

अन्य एक्झिट पोल अंदाज
रिपब्लिक सी व्होटर - भाजप-शिवसेना युती - ३४, काँग्रेस-राष्ट्रवादी १४
टाइम्सनाऊ-व्हीएमआर -  भाजप-शिवसेना युती - ३८, काँग्रेस-राष्ट्रवादी १०
सीएनएन न्यूज १८-आयपीएसओएस - भाजप-शिवसेना युती - ४२ ते ४४, काँग्रेस-राष्ट्रवादी ४ ते ६
न्यूज २४-चाणक्या - भाजप-शिवसेना युती - ३८, काँग्रेस-राष्ट्रवादी १०
रिपब्लिक जन की बात - भाजप-शिवसेना युती - ३४ ते ३९, काँग्रेस-राष्ट्रवादी ८ ते १२

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra lok sabha election exit poll 2019 prediction for 34 seats to bjp shivsena and 13 for congress ncp