पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गेट वे ऑफ इंडिया आंदोलनाचे ठिकाण नाही: गृहमंत्री

गृहमंत्री अनिल देशमुख

जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान एका तरुणीने 'फ्री काश्मीर'चे पोस्टर झळकावले. या पोस्टरवरुन राजकारण तापले आहे. दरम्यान, पोस्टर झळकावणाऱ्या तरुणीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितली. तसंच, गेट ऑफ इंडिया हे आंदोलन करण्याचे ठिकाण नाही, असे देखील त्यांनी सांगितले. 

'काश्मीरला भारत मुक्त करा असे म्हटले तर खपवून घेणार नाही'

अनिल देशमुख यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना स्पष्ट केले की, 'गेट वे ऑफ इंडिया ही ती जागा नाही ज्या ठिकाणी कोणीही आंदोलन करु शकते. कारण यामुळे इतर मुंबईकरांना त्रास होतो आणि वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. तसंच, गेट वे ऑफ इंडिया येथे निषेध करणार्‍या कोणत्याही विद्यार्थ्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार नाही. आम्ही फक्त त्यांचे आंदोलन आझाद मैदानावर हलवले आहे, असे देशमुख यांनी सांगितले. 

जेएनयू हिंसाचार: आयशी घोषसह २२ विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा

दरम्यान, पोलिसांनी 'फ्री काश्मीर'चे पोस्टर झळकावून निषेध करणाऱ्या तरुणीला शोधले आहे. तिच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आम्ही आंदोलनकर्त्यांना विनंती केली आहे की, असे कोणतेही फलक आणू नये. ज्यामुळे ते अडचणीत येतील, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. तसंच, फ्री काश्मीरचे पोस्टर झळकावणाऱ्या तरुणीचे नाव मेहक मिर्झा प्रभू  (३७ वर्ष) असे आहे. ती कवी आणि लेखिका आहे. 

जेएनयू हल्ला : व्हॉट्स अ‍ॅप मेसेज, फोटोंमुळे संशयाची सुई