पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यात 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर नवा कायदा येणार'

गृहमंत्री अनिल देशमुख

अधिवेशन संपण्याअगोदर राज्यात दिशा कायद्याच्या धर्तीवर नवा कायदा होणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्र्यांनी बुधवारी ट्विट करत ही माहिती दिली. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

 आता अमृता फडणवीस यांची आदित्य ठाकरेंवर थेट टीका
 
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'विधानमंडळाचे अधिवेशन संपण्याअगोदर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा करण्यात येणार आहे.' दरम्यान, दिशा कायद्यासारखाच कायदा राज्यात लागू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. आंध्रप्रदेश सरकारने लागू केलेल्या दिशा कायद्याची माहिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी नुकताच आंध्रप्रदेशचा दौरा केला होता.

पत्नी आणि मुलासह सपा खासदार आजम खान यांची रवानगी तुरुंगात

दरम्यान, महिला अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी दिशा कायद्याच्या अनुषंगाने नवा कायदा तयार करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली, असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी दिली होती. नवा कायदा तयार करण्यासाठी गठीत केलेली समिती १० दिवसांमध्ये कायद्याचा मसुदा सादर करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा कायदा अस्तित्वात येण्यास मदत होणार असल्याचे सतेज पाटलांनी सांगितले होते.

सोनिया गांधींच्या वक्तव्याचा जावडेकरांकडून समाचार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra home minister anil deshmukh says disha act will implemented state before budget session ends