पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाधवान कुटुंबियांच्या प्रकरणातील चौकशी या IAS अधिकाऱ्याकडे

गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लाकडाऊन असताना डीएचएफएलचे संस्थापक कपिल वाधवान यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी नियमाचे उल्लंघन केल्याचे समोर आले होते. वाधवान कुटुंबीय लॉकडाऊनचे उल्लंघन करत खंडाळ्यावरुन महाबळेश्वरला गेले होते. याप्रकरणी वाधवान कुटुंबातील २३ जणांविरोधात महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाधवान कुटंबीयांना मदत करणे भोवले, प्रधान सचिव सक्तीच्या रजेवर

याशिवाय वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणाऱ्या विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्यावर  कारवाई करण्यात आली आहे. त्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार असून चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि वित्त विभाग मंत्रालयाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रधान सचिवाची जबाबदारी ही भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि मुंबई गृहमंत्रालयाचे अपर मुख्य सचिव (अपिल व सुरक्षा) कांता सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

१६,००२ नमुन्यांपैकी २ टक्के रुग्णांना कोरोनाची लागण : आरोग्यमंत्रालय

मनोज सैनिक यांना याप्रकरणाची चौकशी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी कपिल वाधवान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील २३ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून  त्यांना पुढच्या १४ दिवसांसाठी पाचगणीतील एका खासगी रुग्णालयात क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Home Dept has ordered an inquiry against IPS Officer Amitabh Gupta to IPS Manoj Sainik