पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील ५ हजारांपेक्षा अधिक जण 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट'मध्ये: आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशात मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात ५ हजारांपेक्षा अधिक जण 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट'मध्ये आले होते. या सर्वांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.

तुमचे कौतुक करायला शब्द अपुरे, आरोग्यमंत्र्यांचे भावनिक पत्र

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट देऊन कोरोनाशी सामना करण्याच्या दृष्टीने उभारलेल्या यंत्रणेचा आढावा घेतला. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुंबईत १६२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या ५ हजार ३४३ झाली असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

Coronavirus: अझीम प्रेमजींचा दानशूरपणा, ११२५ कोटींची केली मदत

तसंच, कोरोना विषाणूचा  फैलाव रोखण्यासाठी मुंबईतील १४६ परिसर सील करण्यात आले आहेत. याठिकाणावरुन कोरोनाचे संक्रमण होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.  सीसीटीव्हीच्या माध्यमातून याठिकाणी नजर ठेवली जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच, मुंबईत ५ सरकारी आणि ७ खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाची तपासणी केली जात आहे. एका दिवसाला २ हजार चाचण्या केल्या जाण्याची क्षमता मुंबईत असल्याचे देखील राजेश टोपे यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra health minister says more than 5000 people in the state have high risk contract