पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गायमुख - शिवाजी चौक आणि वडाळा-सीएसएमटी मेट्रो प्रकल्पाला मान्यता

मुंबई मेट्रो

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई मेट्रो मार्ग - १० आणि मुंबई मेट्रो मार्ग - ११ ला मान्यता देण्यात आली आहे. मुंबईकरांचा प्रवास गर्दीमुक्त, लवकर आणि सुखकारक व्हावा यासाठी मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प राबवले जात आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आरोपपत्र मुंबई सत्र 

गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) या मुंबई मेट्रो मार्ग-१० च्या सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मार्गाची एकूण लांबी ९.२०९ किमी आहे. यापैकी ८.५२९उन्नत तर ०.६८ किमी भुयारी मार्ग आहे. यामध्ये एकूण ४ उन्नत स्थानके असतील. या मेट्रो प्रकल्पाची किंमत सुमारे ४ हजार ४७६ कोटी रुपये इतकी आहे. मार्च २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असणार आहे. प्रकल्पासाठी एमएमआरडीए आणि राज्य सरकार यासह आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे अर्थसहाय्य घेण्यासाठीही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 

मराठवाड्यात एका दिवसात ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

तसंच, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई मेट्रो मार्ग-११) या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मार्गाची एकूण लांबी १२.७७४ किमी आहे. यापैकी वडाळा ते शिवडी ४ किमीचा उन्नत मार्ग तर शिवडी ते सीएसएमटी ८.७६५ किमीचा भुयारी मार्ग असेल. यामध्ये २ उन्नत आणि ८ भूयारी अशी एकूण १० मेट्रो स्थानके असणार आहेत. या प्रकल्प पूर्णत्वाची किंमत सुमारे ८ हजार ७३९ कोटी रुपये इतकी आहे. मार्च २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असणार आहे. एमएमआरडीए आणि राज्य सरकार यांच्या सहयोगातून प्रकल्प पूर्ण केला जाईल. तसेच जागतिक बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था इत्यादी आंतरदेशीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज सहाय्य घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. 

भिवंडीमध्ये ३ गोदाम जळून खाक; १६ तासानंतरही आगीचे रौद्ररुप कायम

हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देत असतानाच हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करणे, त्यासोबत आवश्यकतेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएला नियुक्त करणे या बाबींनाही मान्यता देण्यात आली आहे. मेट्रो - १० च्या प्रकल्पामुळे मुंबई, बोरिवली, मिरा-भाईंदर, ठाणे ही शहरे जोडली जाऊन मेट्रोचे वर्तुळ पूर्ण होईल आणि वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. तर मेट्रो - ११ प्रकल्पामुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट पुनर्विकसित परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. 

'मराठा क्रांती ठोक मोर्चा' विधानसभेच्या सर्व जागा लढवणार