पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टॅक्सी, रिक्षाच्या भाडेवाढीची शक्यता, लवकरच निर्णय

संग्रहित छायाचित्र

टॅक्सी आणि रिक्षांच्या भाड्याची फेररचना करण्यासाठी नेमण्यात आलेल्या खटुआ समितीचा अहवाल राज्य सरकार स्वीकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीची शक्यता आहे. त्याचबरोबर भाड्याच्या आकारणीचीही फेररचना करण्यात येणार आहे. त्यामुळे कमी अंतरासाठी जास्त भाडे द्यावे लागेल. त्याचवेळी जास्त अंतराचा प्रवास करण्यासाठी भाड्यामध्ये मोठा फरक पडणार नाही.

खटुआ समितीचा अहवाल स्वीकारला गेला, तर मुंबईत टॅक्सीचे किमान भाडे २६ रुपये तर रिक्षाचे किमान भाडे २० रुपये असेल. इंधनाचे वाढलेले दर, वाहनचालकांचे राहणीमान, विम्याचा हफ्ता या सर्वांचा विचार करून हे भाडे निश्चित करण्यात आले आहे. भाडे आकारणीच्या नव्या पद्धतीनुसार ८ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी प्रति किलोमीटर भाड्यात घट होणार आहे.

अर्थव्यवस्था असो की क्रिकेट, सगळीकडेच निराशा, पाकचे सरन्यायाधीश हताश

अ‍ॅप आधारित टॅक्सीसेवेच्या कमाल भाड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीही सरकार नवा नियम लागू करण्याची शक्यता आहे. अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवेकडून आकारण्यात येणाऱ्या नेहमीच्या भाड्यामध्ये त्यांना गर्दीच्यावेळी केवळ तिप्पट वाढ करता येईल, असा नियम लागू केला जाईल.

टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडे आणि इतर प्रश्नासंदर्भात नेमण्यात आलेल्या हकीम समितीने दिलेल्या अहवालाचा आढावा घेण्यासाठी निवृत्त प्रशासकीय अधिकारी बी सी खटुआ यांच्या नेतृत्त्वाखाली चार सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. खटुआ समितीने ऑक्टोबर २०१७ मध्येच आपला अहवाल राज्य सरकारकडे दिला आहे. जर या अहवालावर सरकारने निर्णय घेतला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा टॅक्सी व रिक्षा चालक मालक संघटनेने घेतला होता. या प्रकरणी पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते.