पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्रिपदाची घेणार शपथ

आदित्य ठाकरे

शिवसेनेचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. आज आदित्य ठाकरे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपालांकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या नावाची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरेंचे नाव आहे. 

मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता

आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होणार आहे. कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीमध्ये आदित्य ठाकरेंचे नाव सर्वात शेवटी आहे. आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांचे एकूण ३६ नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. २५ कॅबिनेट मंत्री आणि १० राज्यमंत्री आज शपथ घेणार आहेत.

... म्हणून संग्राम थोपटेंच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसचा

दरम्यान, ठाकरे घराण्यातून २९ वर्षांचे आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. वरळी विधानसभा मतदार संघातून आदित्य ठाकरे विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा दारुण पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना ८९ हजार २४८ मतं पडली होती. 

मंत्रिमंडळ विस्तार: 'हे' नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता