पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवार सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री

अजित पवार पुन्हा उप मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. राज्यात आज महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा सुरु आहे. यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्या दरम्यान अजित पवार यांच्यासोबत २५ कॅबिनेट मंत्री आणि १० राज्यमंत्री शपथ घेणार आहेत.

... हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ, राजभवनाकडून यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्ते यांच्याकडून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी वाढली होती. तसंच, अजित पवार हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले होते. अखेर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार हे सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. 

घटकपक्षांना शपथविधीचे निमंत्रणच नाही-राजू शेट्टी

अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर रोजी अचानक भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा बंडखोर गट आणि भाजप यांचे सरकार स्थापन झाले होते. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र अवघ्या ८० तासांत हे सरकार पडले. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवेसना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. 

आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्रिपदाची घेणार शपथ