पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एनकाऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांचा राजीनामा स्वीकारला, निवडणूक लढवण्याची शक्यता

प्रदीप शर्मा

एनकाऊंटर स्पेशलिस्ट पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांचा राजीनामा सोमवारी स्वीकारण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने याची माहिती दिली. 'भाषा' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शर्मा हे शिवसेनेत प्रवेश करुन आगामी विधानसभा निवडणूक पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघातून लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून ते बहुजन विकास आघाडीचे (बविआ) आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 

भाजप नेत्याने टोल कर्मचाऱ्याला केली मारहाण

शर्मा यांनी ३५ वर्षांच्या सेवेनंतर जुलै २०१९ मध्ये स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी ते ठाणे येथे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख होते. शर्मा यांनी १०० हून अधिक गुन्हेगारांना चकमकीत मारल्याचे बोलले जाते.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, गृह विभागाने सोमवारी शर्मा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज जरी स्वीकारला असला तरी अद्याप त्यांच्या पेन्शनसारख्या निवृत्तीनंतरच्या सुविधा मिळणार नाहीत. कारण त्यांनी रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैयाच्या बनावट चकमकप्रकरणीच्या मॅटच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही.

विक्रम लँडर सापडला पण झुकलेल्या अवस्थेत...

राज्य सरकारने दाऊद इब्राहिम टोळीबरोबर असलेल्या संबंधांमुळे आणि चकमकीवरुन २००८ मध्ये शर्मा यांना निलंबित करण्यात आले होते. बनावट चकमकीप्रकरणी २०१३ मध्ये एका सत्र न्यायालयाने त्यांनी निर्दोष ठरवले होते. सरकारने त्यांनी पुन्हा एकदा सेवेत घेतले होते.