पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२५ दिवसांतच दोन मंत्र्यांच्या बंगल्यात बदल

एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात

महाराष्ट्राच्या नव्या मंत्र्यांना शासकीय बंगल्याचे वाटप जाहीर झाले होते. मात्र २५ दिवसांच्या आत दोन मंत्र्यांच्या बंगल्यात बदल करण्यात आले आहेत. गृहमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यांमध्ये बदल करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने पत्रक काढत बंगल्यांमध्ये बदल केला असल्याची माहिती दिली आहे. 

CAA: भाजपच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना २ डिसेंबर रोजी 'रॉयलस्टोन' या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आले होते. मात्र आता त्या ऐवजी त्यांना मलबार हिल येथील 'नंदनवन व अग्रदूत' हा शासकीय बंगला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना ४ डिसेंबर रोजी 'मेघदूत' या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आले होते. मात्र आता त्याऐवजी पेडर रोडवरील 'रॉयलस्टोन' हा शासकीय बंगला त्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

CAA विरोधात दिल्लीतील जामा मशीद परिसरात पुन्हा आंदोलन

दरम्यान, २ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे वाटप जाहीर करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'वर्षा' बंगाल देण्यात आला होता. राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे 'रामटेक' बंगल्याचे वाटप करण्यात आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना 'सेवासदन' या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने पत्रक काढत बंगल्याचे वाटप केल्याचे जाहीर केले होते.

'राबडीदेवीनं पाठवलेल्या सामानात स्फोटकंही असतील'