एकीकडे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे भाजप-शिवसेना युती म्हणजे भारत-पाक फाळणीपेक्षा क्लिष्ट असल्याचे म्हणत युती होण्याबाबत साशंकता व्यक्त करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. ज्यांना युती होणार नाही असे वाटते त्यांची निराशा होईल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
मुंबईत पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. युतीसंदर्भातील जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरु आहे. लवकरची युतीची घोषणा केली जाईल. ज्यांना युती होणार नाही असे वाटते, त्यांची निराशा होईल, असे ते म्हणाले.
तीचे जागावाटप हे भारत-पाक फाळणी इतके क्लिष्टः संजय राऊत
Maharashtra BJP Chief Chandrakant Patil: I am confident that we will get 220 seats in the upcoming assembly elections. https://t.co/eBySrtTq9x
— ANI (@ANI) September 24, 2019
आगामी निवडणुकीत भाजप-सेना युतीला २२० जागा मिळतील याचा पुनरुच्चार पाटील यांनी केला.
तत्पूर्वी, संजय राऊत यांनी जागावाटपाबाबत निराशा व्यक्त केली. एवढा मोठा महाराष्ट्र आहे. या २८८ जागा आहेत त्याची वाटणी भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षा भयंकर आहे. अशा परिस्थितीत आम्ही सत्तेत बसण्यापेक्षा विरोधात बसणे चांगले, असे म्हणत जागावाटपाबाबत जे काही ठरेल, त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ, असे राऊत यांनी म्हटल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.