पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव

अजित पवार

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांसह संचालक मंडळाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी विशेष तपास पथक म्हणजे एसआयटीची स्थापना केली आहे. 

दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या गाडीला सासवडजवळ अपघात

२५ हजार कोटींचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. एमआरए पोलिस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या घोटाळा प्रकरणी ५ दिवसांत सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. अजित पवार, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते-पाटील, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश या प्रकरणामध्ये आहे. 

भायखळ्यातील लाकडाच्या वखारीला भीषण आग

या सर्वांविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणामध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर आता अटकपूर्व जामिनासाठी सर्वच नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा अर्धवट सोडून मुंबईत आले. 

इम्रान खान भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याच्या विचारात