पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चलो अयोध्या! उद्धव ठाकरे ७ मार्चला घेणार श्रीरामाचे दर्शन

उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. येत्या ७ मार्च रोजी मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर जाणार असून यावेळी त्यांच्यासोबत असंख्य शिवसैनिक असतील, अशी माहिती शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांविरोधात गुन्हा दाखल

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये असे सांगितले की,' येत्या ७ मार्च रोजी उद्धव ठाकरे असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येला जाणार आहेत. ७ मार्च रोजी अयोध्येत दुपारी श्रीरामाचे दर्शन घेतील. त्यानंतर संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरती करतील. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यात सामील व्हा.', असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

चीनकडून भारतीय विमानाला परवानगी देण्यास जाणीवपूर्वक विलंब

दरम्यान,  २९ नोव्हेंबर रोजी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर उद्धव ठाकरे अयोध्येला जातील अशी घोषणा संजय राऊत यांनी २२ जानेवारीला केली होती. महाविकास आघाडी सरकारला मार्चमध्ये १०० दिवस पूर्ण होत आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री अयोध्येला जाणार आहेत. 

महाराजांचा जय जयकार करायला कमीपणा वाटतो का?: मनसे