पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर; मोदींसह 'या' दिग्गजांची घेणार भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. तसंच, मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्याचसोबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची सुध्दा ते भेट घेणार आहेत.

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या तरुणीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना युतीमध्ये फूट पडली. अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर राज्यात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच पंतप्रधानांची भेट घेणार आहे. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या भेटी दरम्यान, जीएसटी परतावा, राज्यातील प्रश्नांसंदर्भात त्यांच्यात चर्चा होईल, असे सांगितले जात आहे. 

बारावी गुणपत्रिकेवरील 'अनुत्तीर्ण' शेरा होणार गायब

मुख्यमंत्री १२ वाजता दिल्लीला रवाना होतील. साडेपाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. मोदींच्या भेटीनंतर ते सहा वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतील. त्यानंतर ते साडेसात वाजता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची भेट घेतील. या भेटीनंतर रात्री आठ वाजता ते मुंबईला रवाना होणार आहेत. दरम्यान, या सदिच्छा भेटी आहेत. या भेटी बऱ्याच दिवसांपासून रखडल्या होत्या. त्या आज होणार आहेत. या भेटीला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

दादरमध्ये कापडाच्या दुकानाला भीषण आग