पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जेएनयूतील हल्ल्याने २६/११ची आठवण करुन दिली'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात घडलेल्या प्रकाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निषेध केला आहे. जेएनयूतील झालेला हल्ला भ्याड आणि निंदनीय आहे. या हल्ल्याने २६/११ च्या हल्ल्याची आठवण करुन दिली. या हल्ल्याला जो जबाबदार आहे त्याला शोधा आणि कठोर शिक्षा द्या, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसंच, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या केसालाही धक्का लागून देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. 

 

देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते, अनिल गोटेंची टीका

मुख्यमंत्र्यांनी पुढे असे सांगितले की, 'महाराष्ट्रात अशा प्रकराचे हल्ले खपवून घेणार नाही. महाराष्ट्रातील तरुणांना विश्वास देतो की अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात होऊन देणार नाही. महाराष्ट्रातील तरुण सुरक्षित आहेत.' तसंच, तोंड झाकून हल्ला करणारे डरपोक आहेत. समोर येण्याचे त्यांचे धाडस नाही. या हल्लेखोरांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. दिल्ली पोलिसांचे कर्तव्य आहे की त्यांनी हल्लेखोरांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे. अन्यथा पोलिसांवरही संशय घेतला जाईल. कोणतीच गोष्ट लपून राहत नाही ती जगासमोर येतेच, असे देखील त्यांनी सांगितले. 

'बाळासाहेब ठाकरेंना धोका देणाऱ्याचा सत्यानाश होतो'

या घटनेमुळे संपूर्ण देशात तरुणांच्या मनात भिती आणि राग आहे. देशातील तरुण कोणालाही घाबरणारे नाहीत. ते बॉम्ब आहेत त्यांना पेटवण्याचा प्रयत्न करु नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मी तरुणांसोबत आहे. तरुणांनी महाराष्ट्रात भिती बाळगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात मी काहीच होऊन देणार नाही. इथल्या विद्यार्थ्यांच्या केसाला धक्का सुध्दा लागून देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

'सरकारने सरसकट कर्जमाफी नाही तर सरसकट धोकेबाजी केली'