पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अधिक जगण्यासाठी थोडी शैली बदलू : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. टेहळणी करायला विनाकारण बाहेर पडू नका. अधिक जगण्यासाठी आपल्याला जीवनशैली थोड्या प्रमाणात काही दिवस बदलायची आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले. 

पुण्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

संकटाचा कोणीही संधी म्हणून गैरफायदा करु नये, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनेशी संवाद साधला. आपल्याकडे पुरेसा साठा आहे आपल्याला फक्त त्याचे वितरण कसे करायचे हे आव्हान आहे. ते आपण नियोजित पद्धतीने करु, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

हँडवॉशने हात धुवा, मगच किराणा माल मिळेल; सोलापुरात उपक्रम

रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन लालबागचा राजा गणेश मंडळाने रक्तदान शिबिर सुरु केले. सामाजिक संस्थांनी असे उपक्रम राबवण्याची गरज आहे,असेही त्यांनी सांगितले. घरी राहून प्रत्येकजण सरकारला मोठी मदत करु शकतो. हीच तुमची मदत अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले. मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचही त्यांनी यावेळी कौतुक केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra CM Uddhav Thackeray on Coronavirus Requst Public Change Life Style For Corona Fight