पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ, राजभवनाकडून यादी जाहीर

शरद पवार आणि उद्धव ठाकरे (PTI PHOTO.)

राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी दुपारी होतो आहे. एकूण ३५ आमदारांना यावेळी मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. ज्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे त्यांची नावे राजभवनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. एकूण २५ जण कॅबिनेट तर १० जण राज्य मंत्रिपदाची शपथ घेतील.

अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 

कॅबिनेट मंत्री
अशोक चव्हाण
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
विजय वडेट्टीवार
अनिल देशमुख
हसन मुश्रीफ
वर्षा गायकवाड
राजेंद्र शिंगणे
नवाब मलिक
राजेश टोपे
सुनील केदार
संजय राठोड
गुलाबराव पाटील
अमित देशमुख
दादा भुसे
जितेंद्र आव्हाड
संदिपान भुमरे
बाळासाहेब पाटील
यशोमती ठाकूर
अनिल परब
उदय सामंत
के सी पाडवी
शंकरराव गडाख
अस्लम शेख
आदित्य ठाकरे

राज्य मंत्री
अब्दुल सत्तार
सतेज ऊर्फ बंटी पाटील
शंभुराजे देसाई
बच्चू कडू
विश्वजित कदम
दत्तात्रय भरणे
आदिती तटकरे
संजय बनसोडे
प्राजक्त तनपुरे
राजेंद्र पाटील यड्रावकर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra cm uddhav thackeray cabinet expansion full list of mlas taking oath on 30 december 2019