संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याप्रकरणी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. विरोधकांनीही पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मागावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
फडणवीसांना सत्तेसाठी अति घाई आणि फाजील आत्मविश्वास नडलाः राऊत
मुख्यमंत्री ठाकरे हे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्यावेळी मी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्याला फोन केला होता, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray: Centre should help Maharashtra in helping farmers of the state. Opposition leaders should go and meet Prime Minister and demand financial assistance for the farmers. https://t.co/20gdlDEmrA
— ANI (@ANI) December 1, 2019
लवकरच महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्यात मंत्र्यांच्या तात्पुरत्या खातेवाटपाबापत चर्चा होईल. उर्वरित वाटपाबाबतही निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
खूशखबर!, नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनात ६ टक्क्यांची वाढ
मागील पाच वर्षांपासून किती विकासकामे सुरु आहेत. कोणती कामे अडली आहेत आणि ती का अडली, याची माहिती मागवण्यात आली आहेत. काही विकासकामे अशी असू शकतात ज्याची तातडीने आवश्यकता आहे. तर काहींची कदाचित तातडीची आवश्यकता असू शकते. याचा अहवाल मागवला आहे. तो अहवाल समोर आल्यानंतर पुढील निर्णय घेता येतील, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.