पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी फक्त भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्रीपदावरुन युतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मी एकट्या भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे, असे सांगत  जागा वाटपासंदर्भातील योग्य निर्णय लवकरच घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पक्षासाठी काम करताना पदाचा विचार करु नका, असेही ते म्हणाले. भाजप ही पब्लिक अनलिमिटेड पार्टी आहे. या पक्षावर कोणाचीही मालकी नाही, ज्याला आमच्यासोबत यायचं आहे त्यांचे स्वागत आहे. तिकीट वाटप करताना वशिलेबाजी चालणार नाही. पात्रतेनुसारच तिकीट दिले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपच्या कार्यकारणी बैठकीनंतरच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. कारखाने आणि संस्था काढणे वाईट नाही, पण मागील काही काळात ९० टक्के मंत्र्यांचा वेळ हा आपले कारखाने आणि संस्था वाचवण्यात गेला. आमच्याकडे गमावण्यासारखं आणि कमावण्यासारखं काही नव्हतं. त्यामुळे आम्ही जनतेचा विचार केला, अशा शब्दांत त्यांनी सरकारने केलेल्या विकासाचा दाखला दिला.  

काँग्रेसची अवस्था बर्मुडासारखी, रावसाहेब दानवेंची टीका

लोकसभा निवडणूक जिंकली आता विधानसभा जिंकायची आहे. लोकसभा निवडणुकीची लढाई वेगळी होती. विधानसभा निवडणुकीची लढाई वेगळी असणार आहे. त्यामुळे रणनिती बदलून विधानसभा निवडणुकीत उतरायचे आहे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.  

आघाडी शिवाय लढून दाखवाच, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

महाराष्ट्राची जनता हेच माझे खरे दैवत आहे, असे सांगत त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा एकदा सत्तेत येऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जनतेला गृहित धरले तर पतन सुरु होते. त्यामुळे जनतेत जाऊन काम करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून विधानसभा जिंकुया, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.