पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CM ठाकरेंकडून पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब , जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. उपमख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री म्हणून जबाबादारी देण्यात आली आहे. तर पहिल्यांदा विधानसभेवर निवडून येऊन कॅबिनेट मंत्रिपदी मिळालेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

वडेट्टीवार 'भूकंप' घडवून 'पुनर्वसन' करतील : मुनगंटीवार

विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याची जबाबादारी सोपवण्यातआली असून कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हे अहमदनगरचे आमदार आणि काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आले आहे.

पालकमंत्री पदाच्या जिल्हानिहाय नियुक्त्या पुढीलप्रमाणे...
१. पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
२. मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख
३. मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे  
४. ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
५. रायगड - श्रीमती आदिती सुनिल तटकरे
६. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
७. सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत
८. पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे
९. नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
१०. धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार
११. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
१२. जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
१३. अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
१४. सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
१५. सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील
१६. सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
१७. कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
१८. औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई
१९. जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे
२०. परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
२१. हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
२२. बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
२३. नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
२४. उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
२५. लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख
२६. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
२७. अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
२८. वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
२९. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
३०. यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड
३१. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
३२. वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार
३३. भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
३४. गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख
३५. चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
३६. गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे               

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray has named Guardian Ministers for all 36 districts in the state