पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा अखेर सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तिन्ही पक्षांचे एकूण ३६ नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. यापैकी कोणाकडे कोणते खाते जाणार आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र हा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार आजच खातेवाटप जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

मोदी सरकार हे सहन करणार नाही, HRD मंत्र्यांनी विद्यापीठांना

मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांची यादी तिन्ही पक्षांकडून जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये १० कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे १३ मंत्री शपध घेणार आहे. यामध्ये सुध्दा १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर काँग्रेचे १० मंत्री शपथ घेणार आहे. यामध्ये ८ कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. 

ऑस्ट्रियातील राजदूतांनी घेतले १५ लाख भाड्याचे घर, सरकारने परत

दरम्यान, आज मुंबईत विधिमंडळच्या प्रांगणात दुपारी एक वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला शपथविधी सोहळा असल्यामुळे जय्यत तयारी करण्यात आली आहे. विधिमंडळच्या परिसरातील पार्किंगच्या जागेवर भव्य स्टेज आणि मंडप उभारण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्यामुळे विधिमंडळ परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

दाट धुक्यांमुळे कार कालव्यात कोसळली; ६ जणांचा मृत्यू