पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३० डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, अजित पवारांचे कमबॅक होणार?

शरद पवार आणि उद्धव ठाकरे (PTI PHOTO.)

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार येत्या ३० डिसेंबरला होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. त्याचबरोबर अजित पवार यांचे उपमुख्यमंत्रिपदी पुनरागमन होण्याची शक्यताही या नेत्याने बोलून दाखवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी २ याप्रमाणे ६ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. 

मंत्रिमंडळ विस्तारावरुन सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह्याद्री आतिथी गृहावर सुमारे तासभर चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता, असे राष्ट्रवादीतील सूत्रांकडून समजते. 

राहुल गांधींचा PM मोदींसह शहा अन् RSS वर घणाघात

मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची निश्चित तारीख या नेत्याला विचारली असता त्यांनी दि. ३० डिसेंबरला विस्तार होऊ शकेल असे सांगितले. तसेच अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. यासाठी काँग्रेसबरोबर चर्चा होणार असल्याचेही या नेत्याने सांगितले. 

मागील महिन्यात सत्ता स्थापनेच्या नाट्यावेळी अजित पवार यांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी अचानकपणे हातमिळवणी करुन २३ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

झारखंड विधानसभा निकाल, PM मोदी म्हणाले की, ...

हे सरकार अवघे ८० तासच टिकले. त्यानंतर अजित पवार यांनी वैयक्तिक कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दि. २८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यादिवशी तिन्ही पक्षाच्या सहा मंत्र्यांनी शपथ गेतली. 

मंत्र्यांना खाती देण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असल्याचे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आमचे सहकारी कधी शपथविधीसाठी बोलावतात याची आम्हीही वाट पाहत असल्याचा टोला पवार यांनी काँग्रेसला लगावला. काँग्रेसमुळे मंत्रिमंडळ विस्तार होण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षिरत्या सांगितले. 

पुढच्या दोन मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धोनीविषयीचा संभ्रम

राष्ट्रवादीची मंत्र्यांची यादी तयार आहे का असा सवाल पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, परवानगी घेण्यासाठी आम्हाला कोणाकडे जावे लागत नाही, अशी खोचक टिप्पणी त्यांनी काँग्रेसला उद्देशून केली. तर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने हायकमांडशी चर्चा करुन नावे निश्चित केले जाणार असल्याचे सांगितले.