पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझी निष्ठा कुठं कमी पडली, मंत्रिमंडळात समावेश नसल्याने भास्कर जाधवांचा सवाल

भास्कर जाधव

मी कोणावर नाही स्वतःवरच नाराज आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मी राजकारणात आहे. सहावेळा आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, प्रदेशाध्यक्ष राहिलो. मी राजकारणात नवा नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे जाधव हे नाराज असल्याचे बोलले जाते, त्याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

ते म्हणाले, दिलेला शब्द पाळायचा हे माझं तत्व आहे. मी पूर्वी राष्ट्रवादीत होतो. नंतर शिवसेनेत आलो. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माझं बोलणं झालं असेल, त्यांनी मला काहीतरी शब्द दिला असेल. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते.

सांगलीत नववर्षाच्या पहाटे गाड्यांची तोडफोड करत जाळल्या

माझा मंत्रिमंडळात समावेश असेल असा विश्वास मलाच नव्हे तर इतरांनाही होता. संघर्ष करायचा असो किंवा पक्ष संघटना मजबूत करायची असेल तर तेव्हा भास्कर जाधवच असू शकतो. पण माझे नाव मंत्रिमंडळ विस्तारात न आल्याने मलाही आश्चर्याचा धक्का बसला. याबाबत मला पक्षप्रमुखांकडून समजून घ्यायचे आहे. मी कुठे कमी पडलो. माझी निष्ठा कुठे कमी पडली, हे मला जाणून घ्यायचे आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचा मला अभिमान आहे, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. 

प्रकाश सोळंकेंची नाराजी दूर; राजीनाम्याचा निर्णय मागे

दरम्यान, महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार अखेर सोमवारी झाला. तिन्ही पक्षाच्या ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली. पण या विस्तारानंतर महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. सर्वच पक्षांना आता नेत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही नाराजांची मोठी संख्या आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. तसे ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत.

देश तोडण्याचं इंग्रजांचं अर्धवट काम भाजप पूर्ण करतंयः अस्लम शेख