पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नात्यागोत्याचे राजकारणः वडील मुख्यमंत्री, मुलगा आदित्य कॅबिनेट मंत्री

मंत्रिपदाची शपथ घेताना आदित्य ठाकरे

महाविकास आघाडीच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ५६ जागा जिंकून शिवसेना या महाविकास आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्याचबरोबर त्यांना अपक्षांनीही पाठिंबा दिला आहे. शिवसेनेकडून मंत्रिपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गजांची नावे होती. परंतु, अनपेक्षितपणे युवासेना प्रमुख आणि पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आमदार आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात वडील मुख्यमंत्री आणि मुलगा त्याच मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. 

आदित्यला अनुभव घेऊ द्या मंत्रिपदाचे नंतर पाहू, असे वक्तव्य यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात आणि तेही थेट कॅबिनेट मंत्रिपदी आदित्य यांची वर्णी लागली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणूक निकालानंतर मातोश्रीबाहेर हीच ती वेळ आदित्य ठाकरे मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात आले होते. 

अजित पवार सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री

गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर प्रशासनाबरोबरील बैठकीवेळी आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उपस्थित असायचे. त्यावेळी यावर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली. आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात नसतानाही ते बैठकीला कसे उपस्थित राहू शकतात, असा सवाल करण्यात आला होता.

घटकपक्षांना शपथविधीचे निमंत्रणच नाही-राजू शेट्टी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra cabinet expansion aaditya thackeray son of cm uddhav thackeray took oath as a cabinet minister