पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शहिदांच्या कुटुंबियांना यापुढे १ कोटींची मदत; राज्य सरकारची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस (ANI)

दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. युध्द आणि युध्दजन्य परिस्थितीसह देशातील सुरक्षेसंबंधीत मोहिमांमध्ये शहीद झालेल्या तसंच जखमी झालेल्या जवानांच्या आर्थिक मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या एकरकमी अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांना एक कोटी आणि जखमी जवानांना २० ते ६० लाखांची मदत देण्यात येणार आहे.

धोकादायक इमारतीची नोटीस पाठवली होती; पालिकेचा दावा

युद्ध, युद्धजन्य परिस्थितीत तसेच देशांतर्गत सुरक्षाविषयक मोहिमेदरम्यान शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून एकरकमी अनुदान दिले जाते. आतापर्यंत शहीदांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत दिली जात होती. यापुढे त्यांना १ कोटीची मदत दिली जाणार आहे. तर युध्दात, युध्दजन्य परिस्थिती दरम्यान अपंगत्व आलेल्या जवानांना देखील मदत केली जाते. अपंगत्व आलेल्या जवानांना १५ लाखांची मदत दिली जाते. यापुढे त्यांना ६० लाखांची मदत दिली जाणार आहे.

परशूराम घाटात पुन्हा दरड कोसळली

मंत्रिमंडळ बैठकीत या शहीद जवान आणि जखमी जवानांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १ जोनवारी २०१९ पासून शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या या आर्थिक मदतीची रक्कम एक कोटी रुपये करण्यात आली आहे. तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या राज्यातील जवानांना १ टक्के ते २५ टक्के अपंगत्व आल्यास २० लाख, २६ टक्के ते ५० टक्के अपंगत्व आल्यास ३४ लाख आणि ५१ टक्के ते १०० टक्के अपंगत्वाचे प्रमाण असल्यास ६० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

ICC ODI Rankings : फलंदाजीत कोहली-रोहित तर गोलंदाजीत बुमराहचा