पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतील 'नाईट लाईफ'ला मंत्रिमंडळाची मंजुरी, अशी होणार अंमलबजावणी

आदित्य ठाकरे

गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या मुंबईतील रात्र जीवन प्रस्तावाला (नाईट लाईफ) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी याबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुंबईत तरुणांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी नाईट लाईफला मंजुरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २७ जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एकूण नऊ रहिवासी भागांत पहिल्या टप्प्यात याची अंमलबजावणी होणार आहे.

तान्हाजी करमुक्त, राज्य सरकारचा निर्णय

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई नाईट लाईफमध्ये शहरातील मॉल, मिल कंपाऊंड आणि वांद्रे-कुर्ला संकुलाचा काही भाग केवळ याचाच पहिल्या टप्प्यात समावेश आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी दुकाने किंवा स्टॉल सुरू ठेवता येणार आहेत. अर्थात कोणत्याही दुकानदारावर २४ तास दुकान सुरू ठेवण्याचे बंधन असणार नाही. त्याचवेळी शहरातील पब आणि बारसाठी उत्पादन शुल्क खात्याची नियमावली कायम राहिल. त्यामुळे रात्री दीड वाजता पब आणि बार बंद करणे त्यांच्यावर बंधनकारक असणार आहे. 

नाईट लाईफचा विषय शहरातील तरुणाईचा विचार करून पुढे करण्यात आला होता. त्याला मंत्रिमंडळाने विचार करून परवानगी दिली आहे. नाईट लाईफच्या काळात केवळ वेळेची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. पण दुकाने आणि इतर आस्थापनांवर राज्य सरकारचे इतर सर्व नियम लागू असतील. गरजेप्रमाणे आवश्यक वाटल्यास कारवाईही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

'हिंदूंना शिव्या आणि मुस्लिमांबद्दल प्रेम हेच तर काँग्रेस करत आलाय'

नाईट लाईफबद्दल मुंबईतील सर्व पोलिस उपायुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नसल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.