पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प: बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

ठाकरे सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा तसेच राज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. या अर्थसंकल्पाचे स्वागत करत कृषी विभाग, महिलावर्ग, रोजगार निर्मितीसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आलेली असल्याचे बाळासाहेब थोरातांनी सांगितले. 

हे सरकार गजनी चित्रपटातील नायकासारखे: मुनगंटीवार
 
बाळासाहेब थोरातांनी पुढे सांगितले की, या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरूण, विद्यार्थी, दलित, आदिवासी अल्पसंख्यांक अशा सर्व समाज घटकांना न्याय देणारा आहे. तसेच विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देणारा अर्थसंकल्प आहे. गेल्या पाच वर्षात राज्याची आर्थिक घडी विस्कटली असतानाही या अर्थसंकल्पात विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे, असे त्यांनी सांगितले.  

Maharashtra Budget 2020: अर्थसंकल्पात नवं काय...

या अर्थसंकल्पात जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात योग्य त्या तरतूदी केल्या आल्या आहेत. राज्याचा विकासाचा रूतलेला गाडा पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी या अर्थसंकल्पातून चालना मिळेल असा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला आहे. 

Maharashtra Budget: आमदारांचा विकासनिधी २ वरुन ३ कोटींवर