विधीमंडळात मंगळवारी सादर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करीत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. अर्थमंत्री सभागृहात अर्थसंकल्पातील तरतुदी वाचायच्या आधीच त्याच्या जाहिराती ट्विटरवरून कशा काय प्रसृत झाल्या, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.
Maharashtra Budget : 'सबका साथ' मिळण्यासाठी 'सबका भला' अर्थसंकल्प!
ते म्हणाले, अर्थसंकल्प सादर होण्याआधीच फुटला आहे. हा सभागृहाचा आणि त्यातील सदस्यांचा अवमान आहे. आघाडी सरकारच्या काळात नऊ वर्षे आम्ही अर्थसंकल्प सादर केला. पण एकदाही आमच्या काळात अर्थसंकल्प फुटला नाही. पण आज अर्थमंत्री अर्थसंकल्पातील तरतुदी वाचण्यापूर्वीच जाहिरातींसह त्याचे ट्विट ट्विटर हँडलवर येत होते, याचा अर्थ अर्थसंकल्प फुटलेला आहे, असे अजित पवार म्हणाले.
Maharashtra budget 2019 Updates : अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
सभागृहामध्ये कोणताही सदस्य सोशल मीडिया हँडल वापरू शकत नाही. त्यामुळे बाहेरून कोणीतरी हे ट्विट करीत होते. त्याला अर्थसंकल्प माहिती होता, याकडेही अजित पवार यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी सभागृहाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.