पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्विटरचं महत्त्व समजून घ्या, अर्थसंकल्प फुटलेला नाही : मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. अर्थसंकल्प सादर केला जात असतानाच अजित पवारांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत अर्थसंकल्प फुटल्याचे म्हटले. ट्विटरवर अर्थमंत्र्यांच्या बोलण्याआधीच अनेक गोष्टी येत असल्याचा अजित पवारांनी आरोप केला. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा आरोप फेटाळल्यानंतर विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

Maharashtra budget 2019 Updates : अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

ट्विटरच्या माध्यमातून अर्थसंकल्प फुटल्याचा विरोधकांचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फेटाळून लावला. ट्विटरवरचे पहिल ट्विट २ वाजून १६ मिनिटांचे आहे. अर्थसंकल्पाचे वाचन २ वाजता सुरू झाले आहे. त्यामुळे दोन्हींमध्ये १५ मिनिटांचे अंतर आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. 

संतप्त सूरात मुनगंटीवारांनी सभागृहात दिला ओबीसी जिंदाबादचा नारा

विरोधकांचा गैरसमज झाला आहे. सध्या डिजिटलमाध्यमे अतिशय प्रगत झाली आहेत. अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर काही क्षणात गोष्टी ट्विटरवर येत आहेत. हे बदललेल्या तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. विरोधीपक्षांनी या गोष्टी लक्षात घ्याव्या. आम्ही सकारात्मकतेसाठी त्याचा वापर करत आहोत. अर्थसंकल्प महत्त्वाचा असून विरोधी पक्षांनी सभागृहात यावं असं आवाहनही त्यांनी केलं.