पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

४८ नगरसेवकांसह गणेश नाईकांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते नाईक यांनी भाजपात प्रवेश केला

काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्यासह नवी मुंबई महापालिकेतील ४८ नगरसेवकांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर गणेश नाईक यांनी देशातील मोदींचे नेतृत्व आणि फडणवीसांचे राज्यातील कर्तृत्व सांगत भाजपचे तोंडभरुन कौतूक केले. देशामध्ये अनेक धाडसी निर्णय घेण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सिंहाचा वाटा आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक असल्याचेही बोलून दाखवले.

निष्ठेने वागायचे असल्यास भाजपशिवाय पर्याय नाही: हर्षवर्धन

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० चा उल्लेख करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या कामाचेही कौतुक केले. महाराष्ट्र राज्य हे प्रगतीपथावर आहे. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी तळागाळातील लोकांसाठी चांगले काम केल्याचे गणेश नाईक यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांचे स्वागत केले. गणेश नाईक यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला

राज्यातील वाहन धारकांना दिलासा! नव्या कायद्याला तूर्तास स्थगिती

मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हा एक मोठा परिवार आहे. यात सामील होणाऱ्या सर्वांचे स्वागत करुन पक्षाचा विस्तार करणे आनंदाची गोष्ट आहे. नाईक यांच्यासह भाजपात प्रवेश केलेल्या प्रत्येक नगरसेवक आणि महापौर यांच्या येण्यामुळे हा परिवार आणखी विस्तारित झाला आहे. लोक सत्तेसाठी नाही तर मोदींच्या नेतृत्वाखाली जनहिताच्या भावनेने भाजपात येत आहेत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.