पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही सूडबुद्धीने वागणारे नाही, उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (photo: Bachchan Kumar)

अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात एकत्र आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार येणार म्हणजे येणार, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. त्याचबरोबर सध्याच्या पक्षांतरावर भाष्य करताना उद्धव यांनी शिवसेना हा सूडबुद्धीने वागणारा पक्ष नसल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत सूचक वक्तव्य केले. 

राज्य बँकेत एका पैशाचाही भ्रष्टाचार नाहीः अजित पवार

विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार की नाही याबाबत संभ्रम कायम असतानाच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने अनेकांचे याकडे लक्ष लागले होते. व्यासपीठावर दोन्ही नेत्यांची देहबोली ही सकारात्मक दिसत होती. त्यातल्या त्यात मुख्यमंत्री फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना हास्यविनोद करताना दिसले. सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषण केले. त्यांनी माथाडी कामगारांच्या पाठीशी युतीचे सरकार आता आणि निवडणुकीनंतरही सोबत राहिल अशी ग्वाही दिली. 

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेळाव्याचे आयोजक नरेंद्र पाटील यांची माफी मागितली. राज्याचा प्रमुख कार्यक्रमास वेळेवर आल्यानंतर मी उशिरा येणे योग्य नाही. त्यासाठी मी माफी मागतो, असे ते म्हणाले. 

ज्यांनी गुन्हा दाखल केला असेल त्यांचे धन्यवाद! : शरद पवार

मराठी माणूस संघर्ष करु शकतो, याची जाणीव बाळासाहेब ठाकरे आणि अण्णासाहेब पाटील यांनी करुन दिल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. माथाडी कामगारांचा मेळावा हा भावनिक मेळावा आहे. तुमच्या हक्काचे सरकार सत्तेवर आले पाहिजे. महायुतीचे सरकार येणार म्हणजे येणार. माथाडी कामगाराच्या मुलास खासदार झालेले पाहायचे आहे, असे नरेंद्र पाटलांना उद्देशून त्यांनी म्हटले. महाराष्ट्राची माती ही देशाला दिशा देणारी माती आहे. माथाडी कामगार हा कामगार न राहता मालक झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

मालकाच ऐकून ईडी 'येडी' झालीय : सत्यजित तांबे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 we are not taking revenge says uddhav thackeray cm devendra fadnavis