पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरू, मुंबईत महत्त्वाची बैठक

शरद पवार

लोकसभा निवडणुकीसाठीचे महाराष्ट्रातील चार टप्प्यांचे मतदान गेल्या सोमवारी पूर्ण झाले. पण यानंतर लगेचच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होते आहे. त्यासाठी उद्या, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसने एक महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये आयोजित केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीची पहिली पायरी म्हणून पक्षाने सर्व आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष यांची बैठक शनिवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बोलावली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांनाही या बैठकीला बोलावण्यात आले आहे. पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. त्याचबरोबर राज्यातील सध्याचे महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत. दुष्काळाची स्थिती काय आहे, यावरही बैठकीत चर्चा केली जाईल. राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली युती सरकारला खिंडीत गाठण्यासाठी काय रणनिती आखता येईल, याबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेतेही बैठकीत आपले मत मांडणार आहेत.

'पंतप्रधानपद स्वीकारण्यास तयार नाही असे पवार म्हणालेच नाहीत'

लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या सोमवारी मतदान केल्यानंतर लगेचच शरद पवार यांनी दुष्काळी भागांचा दौरा सुरू केला. राज्यातील दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रामीण भागात हा निवडणुकीतील प्रचाराचा मु्द्दा होऊ शकतो, असेही पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

२०१४ मधील खराब कामगिरीचा विचार केला असता, आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ चार जागांवर विजय मिळवला होता. त्याआधीच्या लोकसभा निवडणुकीत २००९ मध्ये पक्षाने ८ जागांवर यश संपादन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी वाटचालीसाठी राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पाच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रात आणि राज्यात सत्तेतून बाहेर आहे. अजून पाच वर्षे सत्तेतून बाहेर राहण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आल्यास त्याचे काही नेते पक्ष सोडून जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Gadchiroli हल्ला : शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

२००४ मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत ७१ जागांवर विजय मिळवला होता. २००९ मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा ६२ पर्यंत खाली आल्या होत्या. तर २०१४ मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ ४१ जागांवर विजय संपादन केला होता.